About Us

राजमाता जिजाऊसाहेबांच्या आशिर्वादाने आणि छत्रपती शिव-शंभूंमहाराजांच्या पराक्रमाने लाभलेल्या या स्वराज्य भूमीचे आपण काहीतरी देणे लागतो , त्याच कर्तव्याची जाणीव ठेऊन टाकलेले एक पाऊल म्हणजेच " सेवेचे ठायी तत्पर ".

We have to pay something for this Swarajya (country), the blessings of Rajmata Jijau Saheb, and the power of Chhatrapati Shivaji Maharaj & Chhatrapati Shambhaji Maharaj, we take this step to serve our society with one motto in mind, "Always ready to serve".

संस्थेची स्थापना साल २०१५ मध्ये झाली. महाराष्ट्रातील किल्ल्यांची बिकट परिस्थिती पाहून आणि किल्ल्यांची काळापुढे असलेली गरज समजून घेऊन, आपण ह्या परिस्थिती सुधारणा आणून लोकं पुढे हे  विषय मांडण्याच्या भावनेनी झाली. हळू हळू अनेकांनी ह्या चळवळीत सहभागी होण्याचा ठरवलं आणि हा परिवार वाढत गेला. आज महाराष्ट्रभर संस्थेचे कार्यकर्ते आहेत. प्रत्येक जण आपापल्यापरीने वैयक्तिक व सामाजिक पातळीवर संस्थेचे कार्य पुढे घेऊनजायचा प्रयत्न करत आहे.
दुर्ग स्वच्छता आणि संवर्धनासोबत इतर अनेक ठिकाणी संस्था कार्यरत आहे, जसे की, जुहू चौपाटी स्वच्छता मोहीम, गणेश उत्सवाच्या काळात पोलिसांना मदत, शिवराजयभिषेक उत्सवात रायगड किल्ल्यावर गर्दीचे नियोजन, समाज प्रबोधन इत्यादी.
संस्थेची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी कुठूनही आर्थिक साहाय्य ना घेता, संस्थेचे कार्यकर्ते स्वतः बनवलेले कागदी कंदील, १००% पर्यावरण पूरक गणेशमूर्ती, गिर्यारोहण, युट्युब वरती ऐतिहासिक चित्रफीत अश्या अनेक उपक्रमातून संस्थेला आर्थिक पाठबळ देतात.

Established in the year 2015. Understanding the dire situation of the forts of Maharashtra and understanding the necessity of forts in today's time, we were encouraged to bring this situation in front of the society and make people think about this further. Gradually many people decided to join in this movement and this family grew. Today, there are activists from all over Maharashtra. Everyone is trying to carry out the work of the organization on a personal and social level.
With cleaning and conservation of forts, we are working in many other fields, such as the Juhu Chowpatty cleanliness campaign, helping police during Ganesh festivities, crowd management for Shivrajyabhishek festival at Raigad fort etc.

Without any financial assistance from anywhere, the organization's volunteers give financial support to the institution through many programs like, 100% environmental products for diwali, Eco Friendly Ganesh idols, commercial treks, historical educational videos on Youtube.

संस्थेची कार्यकारणी
संस्थापक- सत्यजित भोसले, गजानन पाटील, अरविंद सावंत, अभिषेक सावंत
अध्यक्ष- सत्यजित भोसले
उपाध्यक्ष- प्रशांत काळाने
सचिव- अरविंद सावंत
खजिनदार- अनिरुद्ध थोरात 
महिला प्रमुख- पूनम भोसले